॥आरोग्यम् धनसंपदा||
सोशल मीडियावरचा आगळा वेगळा वैद्यकीय उपक्रम...
१.प्रश्न :दोन वेळा दात घासले तरी तोंडाला वास का येतो?
आपण सगळ्यांनी 'क्लोज अप' ची जाहिरात पाहिलीच असेल ...गंमतीचा भाग सोडा ,पण तोंडाची दुर्गंधी हा अनेक वेळेला चिंतेचा विषय होऊ शकतो.सुखी दाम्पत्य जीवनात,मित्र मैत्रिणींमध्ये, ऑफिसमध्ये हा विषय आपल्याला चिंताग्रस्त करू शकतो.
कशामुळे येते तोंडाला दुर्गंधी?या समस्या दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे?
१.तुम्ही दात कसे स्वच्छ ठेवता त्यावर तुमच्या तोंडाला वास का येतो हे अवलंबून असतं...
🔶जर तुम्ही रोज ब्रशच्या साहाय्याने दात नाही घासले आणि फ्लॉस(floss) नाही वापरला तर अन्नकण जमून रहातात व त्यावर जीवाणू(बॅक्टरिआ) जमतात,जे तोंडाच्या दुर्गंधीला कारणीभूत असतात.
🔶आंशिक कवळी किंवा पूर्ण दातांच्या कवळ्या जर स्वच्छ नाही ठेवल्या तर दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जीवाणूंमुळे व राहिलेल्या अन्नकणांमुळे तोंडाला वास येऊ शकतो.
🔶तुमचं खाणं देखील तुमच्या तोंडाच्या दुर्गंधीला आणि उच्छवासातून येणाऱ्या दुर्गंधीला कारणीभूत असते.जसं कांदा ,लसूण ,मुळा असे विशिष्ट पदार्थ आहारात आल्याने तोंडाला वास येऊ शकतो तो पूर्ण गंध शरीरातून नाहीसा होईपर्यंत ...
🔶हिरड्यांचे आजार हेही एक महत्त्वाचे कारण आहे .
हिरड्यांचे आजार ,दातांवरील प्लाक् (किटणातील) जीवाणूंमुळे होतो ,जे काही टॉक्सिन्स् (विषारी /हानिकारक ) द्रव्ये सोडतात ज्यामुळे हिरडया व इतर सभोवतालच्या गोष्टींना इजा होऊन त्या आपली जागा सोडतात(सुजतात व त्यात पुन्हा जीवाणूंची वाढ होऊन तोंडाला दुर्गंधी येते.
🔶 ज्यांना dry mouth ( xerostomia) नावाचा आजार असतो तो सुद्धा तोंडाच्या दुर्गंधीला आमंत्रण देऊ शकतो.
तोंडातील लाळ हे तोंड स्वच्छ करण्याचे काम करत असते.तोंडाद्वारे श्वसन करणे ,लाळ ग्रंथीचे आजार आणि काही औषधांमुळे हा त्रास होऊ शकतो ज्यामुळे दुर्गंधी येऊ शकते.
🔶जर तुम्ही तंबाखू किंवा तत्सम गोष्टी वापरत असाल तर तुम्हाला तोंड शुष्क पडणे ,हिरड्यांचे आजार आणि तोंडाचा कॅन्सर ही होऊ शकतो.आणि तुमच्या तोंडाला दुर्गंधी येऊ शकते .
🔷प्रतिबंध व उपाय:🔷
दातांची ,हिरड्यांची आणि दातांच्या
परिवेष्टनाची स्वच्छता ,दातांचे आरोग्य सांभाळणे हे दुर्गंधी कमी करण्याचे साधन आहे.
🔸दिवसातून दोन वेळा टूथपेस्ट ने ब्रश करणे .
🔸 डेंटल फ्लॉस वापरणे
🔸जीभ स्वच्छ ठेवणे
🔸जेवल्यावर खळखळून चूळ भरणे
🔸कवळी वापरत असाल तर ती साफ ठेवणे हे आवश्यक आहे आणि जर असा त्रास होतच असेल तर
१.दंतरोग तज्ञाकडे जाणे.
२.दात व तोंड तपासून घेणे.
३.दात व हिरड्या साफ करणे.
४.जो काही दातांचा त्रास असेल तर त्यावर उपाय करणे हाच उत्तम उपाय आहे ..
५.हिरड्यांच्या आजारावर अनेक प्रगत उपचार आहेत ते 'हिरड्या व परिवेष्टनकोशाच्या आजाराचे तज्ञ' (periodontist) करू शकतात.त्यांची मदत घेऊन आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या दुर्गंधीपासून आपण कायमची सुटका मिळवू शकतो .
संदर्भ:
१.दंतकथा - डॉ. दीपक श्रीराम मांडे
२.essentials of preventive community dentistry- सोबेन पीटर
सल्ला-दोन वेळा दात घासून जर तोंडाला वास येत असेल तर वरील कारणे पहावी लागतील.जर दातांवर किटण जमा झाले असेल तर दंततज्ञांचा सल्ला घ्या!! त्यांनी सुचवलेला उपाय अमलात आणा!!
धन्यवाद!!
वैद्यकीय गट-डॉ.अर्चना चव्हाण (B. D. S.)
९८५०९८८५४१
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#सर्वत्रमराठी
Salsa from the Tintori at Tamadora - Titanium Steel
ReplyDeleteSalsa from the titanium carabiners Tintori at Tamadora. Salsa from the Tintori at titanium chopsticks Tamadora. titanium rings Salsa from the Tintori at Tamadora. Salsa from the Tintori at Tamadora. Salsa from seiko titanium the Tintori at ridge titanium wallet Tamadora.